बुलडाणा - प्रेयसी आणि तिच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना बुलडाण्यात घडली. विष्णू जाधव( वय 38 ) असे मृताचे नाव आहे. ते बुलडाणा येथील सुवर्ण नगर भागात राहत होते. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसी आणि तिला मदत करणाऱ्या एकास अटक केली आहे.
प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या; ब्लॅकमेलिंगचे पुरावे दिले मुलीकडे - विष्णू जाधव आत्महत्या
प्रेयसी आणि तिच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना बुलडाण्यात घडली. विष्णू जाधव( वय 38 ) असे मृताचे नाव आहे.
![प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या; ब्लॅकमेलिंगचे पुरावे दिले मुलीकडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4331529-thumbnail-3x2-buldana.jpg)
विष्णू यांचा बुलडाण्यात चटई बनवण्याचा व्यवसाय होता. जुनी ओळख असलेली प्रेयसी विद्या उमाकांत दांदडे त्यांच्याकडे लग्नासाठी गळ घालत होती. आपल्या काही नातेवाईकांसह मिळून विद्याने जाधव यांना ब्लॅकमेल करायला सुरवात केल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपल्या चटई गोदामात गळफास घेतला.
आत्महत्या करण्यापूर्वी जाधव यांनी प्रेयसी सोबत झालेले संवाद आणि ब्लॅकमेलिंगचे पुरावे ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात आपल्या मुलीला दिले होते. त्या आधारे शहर पोलिसांनी मंगळवारी प्रेयसीसह सतीश राजपूत, अरुण सुसर, विशाल सूर्यवंशी आणि वंदनाबाई भोंडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रेयसी विद्याला न्यायालयासमोर हजर केले असता तिला ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.