बुलडाणा - राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज बुलडाण्याच्या दौऱ्यावर येत आहे. वडेट्टीवार सकाळी शासकीय विश्रामगृह, खामगांव येथे येतील. त्यानंतर ते कोल्हटकर स्मारक मंदीर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ बुलडाणा जिल्हा आयोजित विदर्भस्तरीय ओबीसी महाअधिवेशनास उपस्थिती नोंदवणार आहेत. त्यानंतर ते शेगांवकडे जाणार आहेत.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा दौरा-
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांचा जिल्हा दौऱ्यावर येत असून ते दुपारी ३ वाजता बाळापूर येथून शेगांव येथे जातील करतील. शेगांव येथे गजानन महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर ते सायंकाळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते बुलडाण्यात मुक्काम करणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते सकाळी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन समिती सभागृह येथे जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती नोंदवतील. या बैठकीनंतर पाटील यांच्या पुढील बैठका होणार आहेत-
- सकाळी १०.३० ते ११.१५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता बैठक
- सकाळी ११.१५ वाजता बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक
- दुपारी १२ वाजता मलकापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक
- दुपारी १२.४५ वाजता चिखली विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक
८ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता पाटील हे बुलडाणा येथून सिंदखेडराजाकडे जाणार आहेत. सिंदखेडराजा येथे ते राजमाता जिजाऊ जन्मस्थळास भेट देतील. सायंकाळी ६.३० ते ७.१५ वाजता ते सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक घेणार आहे. त्यानंतर रात्री ते औरंगाबादसाठी निघणार आहेत.
हेही वाचा - आपले क्षेत्र सोडून बाकी विषयावर बोलताना सचिनने काळजी घ्यावी, शरद पवारांचा सल्ला