महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'इंदोरीकर महाराजांचे कीर्तन खरे अध्यात्म नसून स्थूल अध्यात्म'

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अपत्य प्राप्तीसाठीच्या वक्तव्यामुळे सर्व स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

vijay pandhare
विजय पांढरे

By

Published : Feb 18, 2020, 11:17 PM IST

Updated : Feb 18, 2020, 11:27 PM IST

बुलडाणा - इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन खऱ्या अध्यात्मावर नसून स्थूल अध्यात्मावर आहे. त्याला फार काही महत्त्व देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया सेवा निवृत्त अधीक्षक अभियंता विजय पांढरे यांनी दिली.

सेवा निवृत्त अधीक्षक अभियंता विजय पांढरे

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या आपत्य प्राप्तीसाठीच्या वक्तव्यामुळे सर्व स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, इंदोरीकर महाराज यांना ट्रोल करण्यामागे राजकारण तर दडले नाही ना, असा संशय पांढरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच असे अशास्त्रीय उल्लेख करणे कीर्तनकारांनी टाळले पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला.

Last Updated : Feb 18, 2020, 11:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details