महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेगावच्या आयटीआयमध्ये प्राचार्यांची मग्रुरी; विद्यार्थ्यास अपमानित केल्याचा व्हिडिओ व्हायरल - principal of shegaon iti

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला संस्थेच्या प्राचार्यांनी शिवीगाळ करत अपमानित केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. या प्रकरणी विद्यार्थ्याशी मग्रुरीची भाषा वापरणाऱ्या प्राचार्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

shegaon iti news
शेगावच्या आयटीआयमध्ये प्राचार्याची मग्रुरी

By

Published : Jan 4, 2021, 7:15 AM IST

Updated : Jan 4, 2021, 7:28 AM IST


बुलडाणा- विद्यार्थ्याला "आताच माझ्यासमोर जीव दे, मी तुझे डॉक्यूमेंट देत नाही, हे कॉलेज काही तुझ्या बापाच नाही, जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग ही बाई मला शिव्या देतेय!" असं म्हणून गरीब विद्यार्थ्याला शिविगाळ करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे. याच शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या आम्रपाल भिलंगे या विद्यार्थ्यासोबत ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

शेगावच्या आयटीआयमध्ये प्राचार्यांची मग्रुरी

आम्रपाल हा शेतकऱ्याचा मुलगा असून त्याला पुढील शिक्षणासाठी त्याची मूळ कागदपत्रे शेगाव येथील आय.टी.आय.मधून हवी होती. यासासाठी त्याने प्राचार्यांयाकडे मागणी केली असता, त्या संतापल्या. तसेच तू आता यापुढे मला दिसू नको, आताच माझ्यासमोर मर, असे म्हणून अपमानीत करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्याशी अशा प्रकारचे संवाद साधणाऱ्या प्राचार्याचे नाव राजश्री पाटील असे आहे.

डिझेल मेकॅनिक शाखेचा विद्यार्थी-


बुलडाणा जिल्ह्यातिल संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील आम्रपाल भिलंगे हा शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डिझेल मॅकेनिकल शाखेत गेल्या दोन वर्षापासून शिकत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने व आई वडील दोघांना हृदयविकाराचा आजार असल्याने ते शेतीचे काम करू शकत नाही. त्यामुळे साहजिकच आम्रपाल याला शेती सांभाळावी लागली. म्हणून त्याने या वर्षी शिक्षण जवळच्या गावात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्याचे जमा असलेले मूळ कागदपत्रे हवी होती. त्यासाठी आम्रपाल हा ते घेण्यासाठी रितसर अर्ज घेऊन प्राचार्यांकडे गेला असता, त्याला प्रचार्याकडून अपमानित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुढील शिक्षणासाठी मूळ कागदपत्राची मागणी केल्याने विद्यार्थ्यांला मिळाली शिवीगाळ-

या वर्षी शिक्षण जवळच्या गावात घेण्याचा निर्णय घेतल्याने पुढील शिक्षणासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्याचे जमा असलेले मूळ कागदपत्रे देण्यासाठी आम्रपाल याने विनंती प्राचार्यांंना केली. मात्र, प्रचार्याकडून नकार दिल्यावर आता "माझ्या करिअरबद्दल विचार करावा, माझ्या समोर आता मरण्याशिवाय पर्याय नाही!" अशी भावना आम्रपाल याने व्यक्त केली. त्यावर प्राचार्यांना दया न येता तू माझ्यासमोर आताच मर, आम्ही काही तुझ्या बापाचे नोकर नाही, हे कॉलेज काही तुझ्या बापाचे नाही!" यावरचं त्या थांबल्या नाहीत तर आम्रपाल याला शिविगाळ करून" जा मुख्यमंत्र्यांना जाऊन सांग की ही बाई मला शिव्या देते म्हणून" अशा शब्दात महिला प्राचार्याने त्याला अपमानित केले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जर शिक्षकच विद्यार्थ्याला मर म्हणून सांगत असतील तर कस? म्हणून आता आम्रपाल व त्याच्या आई वडिलांनी अशा उर्मट प्राचार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आमचा मुलगा पुरता खचला असून त्याने जर जीवाचं बर वाइट केलं तर आम्ही कसं जगायचं असा सवालही आम्रपालच्या वडिलांनी उपस्थित केला आहे.

व्हायरल व्हिडिओबाबत प्राचार्या राजश्री पाटील यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार-

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर माध्यम प्रतिनिधींनी प्राचार्या राजश्री पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगाव येथे गेले असता, त्यांच्यासोबत ही राजश्री पाटील यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन हुज्जतबाजी केली. सुरुवातीला असे काही घडलचं नाही असे म्हणून हा विषय झटकण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला. मात्र, पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्यांनी हा व्हिडिओ बाबत कबुली दिली. पण सदर घटनेवर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अशा उर्मट प्राचार्यांवर गरीब शेतकरी विद्यार्थ्याच्या भावितव्याशी खेळण्याबद्दल करवाईची मागणी जोर धरु लागली आहे.

Last Updated : Jan 4, 2021, 7:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details