महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vidarbha Nirman Yatra : वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ निर्माण यात्रा; माजी आमदार वामनराव चटप यांची माहिती - सिंदखेड राजा

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी राज्य आंदोलन समितीच्या वतीने 21 फेब्रुवारीपासून विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातून बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजामधून तर, पूर्व विदर्भातून सिरोंचा येथून ही यात्रा नागपूरकडे निघणार आहे अशी माहिती माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 7, 2023, 10:25 PM IST

वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ निर्माण यात्रा

बुलडाणा : विदर्भ राज्य वेगळे व्हावे यासाठी पुन्हा एकदा आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भ निर्माण यात्रा काढणार असून येत्या 21 फेब्रुवारीपासून या यात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातून बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजामधून तर, पूर्व विदर्भातून सिरोंचा येथून ही यात्रा नागपूरकडे निघणार आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.

विदर्भ मिळवू यंदा :गत अनेक वर्षापासूनची स्वतंत्र विदर्भाची मागणी कायमची निकाली काढण्याचा निर्णय झाला होता. मिशन २०२३ अंतर्गत 'विदर्भ मिळवू यंदा' अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली. त्यामुळे 21 फेब्रुवारीपासून 'विदर्भ निर्माण यात्रेला' प्रारंभ होणार आहे.'शुरू हुई है जंग हमारी,लढेंगे,जितेंगे, कटंगे मगर हटेंगे नही! अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीने घेतल्याची माहिती माजी आमदार, समिती प्रमुख वामनराव चटप यांनी बुलडाणा येथे प्रसारमाध्यमांना दिली.

गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून जाऊ :वामनराव चटप पुढे म्हणाली की, सर्वसामान्यांना स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न कळवा आणि गावागावात व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने यात्रा काढण्यात येत आहे.'लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून जाऊ'. असे त्यांनी सांगितले. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष थांबवायचा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायचे असतील तसेच नक्षलवादाला आळा घालायचा असेल तर विदर्भवाद्यांनी पुढे यायला हवे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. विदर्भातील माणसाला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे वामनराव चटप म्हणाले.

गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून जाऊ :विदर्भ राज्य वेगळे व्हावे यासाठी पुन्हा एकदा विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भ निर्माण यात्रा काढणार असून येत्या २१ फेब्रुवारीपासून या यात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातून बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मधून तर पूर्व विदर्भातून सिरोंचा येथून ही यात्रा नागपूरकडे निघणार आहे.

हेही वाचा -Pravin Togadia on Hindu : भारतात हिंदू सुरक्षित नाहीत; प्रवीण तोगडिया यांचे वादग्रस्त विधान

ABOUT THE AUTHOR

...view details