महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Demand of Vidarbha : विदर्भ आंदोलन समितीचा 19 डिसेंबरला विधान मंडळावर हल्लाबोल - विदर्भ आंदोलन समिती विधिमंडळावर मोर्चा

वेगळ्या विदर्भ मागणीसाठी विदर्भ आंदोलन समिती ( Vidarbha Movement Committee ) 19 डिसेंबरला विधान मंडळावर मोर्चा ( Vidarbha Andolan Committee March on Legislature ) काढणार आहे. लाठी खाऊ गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेवू, असा निर्धार विदर्भ आंदोलन समीतीने केला आहे.

Demand of Vidarbha
विदर्भ आंदोलन समिती

By

Published : Dec 9, 2022, 4:10 PM IST

बुलडाणा - विदर्भाची मागणी कायम ( demand for Vidarbha ) निकाली काढण्याच्या दृष्टिने विदर्भ मिळवू या मागणीची पुर्तता करण्याकरीता लाठी खाऊ गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेवू. आता आरपारच्या लढाईची सुरुवात १९ डिसेंबर रोजी होणार असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळावर "हल्लाबोल आंदोलन" ( Vidarbha Andolan Committee March on Legislature ) केले जाणार आहे.

विदर्भ आंदोलन समिती

लढेंगे जितेंगे -"शुरु हुई है जंग हमारी, लढेंगे जितेंगे" या इर्षेने हे आंदोलन आता तीव्र केले जाणार आहे. विदर्भातील खासदारांचे राजीनामे मागण्याच्या केलेला प्रयोग विदर्भातील जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला असून हल्लाबोल आंदोलनात १० हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तर या आंदोलनात महाराष्ट्रवादी चले जावो अशी घोषना विधान मंडळावरील आंदोलनात करणार आहे.

मोर्चा विधानभवनावर धडकणार - शिवाय यापुढिल विधानसभा ही विदर्भाांचीच होईल महाराष्ट्राची असणार नाही, असा निर्धार या आंदोलनातून होणार आहे. आज बुलडाणा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीती बैठक पार पडली. यावेळी समितीने विधान भवनावर जाणार असल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details