बुलडाणा - जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात राहणारे पीडित युवक-युवतीला जालना जवळील गोंदेगाव शिवारात 3 दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे दोघेही प्रेमीयुगुल बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असून हे प्रेमीयुगुल फिरायला गेले होते. मात्र, टवाळखोर गुंडाकडून त्यांना मारहाण करत तरुणीचा विनयभंग करण्यात आला होता. टवाळखोरांनी त्या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही झाली होती.
जालन्यात मारहाण झालेल्या 'त्या' पीडित प्रेमीयुगुलाने थाटला संसार..बुलडाण्यातील मंदिरात केले लग्न
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात राहणारे पीडित युवक युवतीला जालन्या जवळील गोंदेगाव शिवारात ३ दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. त्या प्रेमीयुगुलाने मेंडगाव येथे देवीच्या मंदिरात लग्न केले.
या प्रकरणात राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आज (सोमवार) 3 फेब्रुवारीला दोन्ही पक्षाकडील मंडळींकडून दोघांचे लग्न लावून देण्यात आले. हे लग्न मेंडगाव बायगाव येथे देवीच्या मंदिरात झाले असल्याचे कळते आहे. एकाच समाजातील असल्याने आणि मुलगा आणि मुलगी लग्नासाठी तयार असल्याने हे लग्न अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीने करण्यात आले. त्यामुळे आता या दोघांच्या प्रेमप्रकरणाला पूर्णविराम जरी मिळाला असला, तरी या प्रेमीयुगुलाच्या मारहाणीच्या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्र्र हादरून गेला होता हे विशेष.