बुलडाणा- भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा वंचितचे पार्लमैट्री बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांनी खांमगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोविड वार्डमधील कोरोनाग्रस्त रुग्णाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन सादर करून परवानगी मागितली आहे.
मला देशाचा एक सामान्य सामाजिक नागरिक म्हणून जाण आहे. आमचे सर्वाचे प्रेरणास्थान तसेच गोरगरीब, उपेक्षीत व वंचितांचे कैवारी श्रध्देय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्योग-व्यवसाय व सार्वजनिक वाहतूूक सुरू व्हावी यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे. तसेच आरोग्य विभाग,पोलीस, विभाग, महानगरपालिका व नगरपालिका कर्मचारी यांच्या अपूर्व सेवेबद्दल आभार व्यक्त केले आहेत. स्वतः राज्यभर दौरा करून जनतेच्या मनातील कोरोनाची भीती दूर करत आहेत. सामान्य जनतेच्या वेदना समजून ते स्वतः प्रामाणिक भावनेने कार्यप्रवण आहेत. समाज जीवन पूर्ववत व्हावे यासाठी आपण सर्वांनी ही सामूूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.