महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात 1 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण - बुलडाणा जिल्हा लेटेस्ट न्यूज

बुलडाणा जिल्ह्यामध्ये 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 45 वर्षांवरील 8 लाख 79 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सोमवारी जिल्ह्याला आणखी 25 हजार कोव्हिशील्ड लस प्राप्त झाल्या आहेत.

जिल्ह्यात 1 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात 1 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण

By

Published : Apr 13, 2021, 5:33 PM IST

बुलडाणा -बुलडाणा जिल्ह्यामध्ये 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 45 वर्षांवरील 8 लाख 79 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सोमवारी जिल्ह्याला आणखी 25 हजार कोव्हिशील्ड लस प्राप्त झाल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला होता. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, दुर्धर आजार असणारे आणि ज्येष्ठ नागरिक या क्रमाने लसीकरण करण्यात येत आहे. आता 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात लसीकरणसाठी 102 लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. प्रारंभी मोजक्याच चार केंद्रावर लसीकरण करण्यात येत होते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. दरम्यान सोमवारपर्यंत बुलडाणा आरोग्यविभागाकडे 6 हजार लसींचा साठा होता. सोमवारी पुन्हा नव्या 25 हजार लसी मिळाल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात 1 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण

नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन

दरम्यान नागरिकांनी जवळच्या लसीकरणत केंद्रात जावून लसीकरण करून घेण्याचे आवाहन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यात 102 कोरोना लसीकरण केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लसकरण करून घ्यावे, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. तसेच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन देखील करावे असे आवाह, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी केले आहे.

हेही वाचा -अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा

ABOUT THE AUTHOR

...view details