बुलडाणा- जिल्ह्यातील खामगाव व मोताळा तालुक्यात सोमवारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे होळी सण साजरा करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. होळीचे दहन करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या नागरिकांवर होळीवर ताडपत्री झाकण्याची वेळ आली. त्याचबरोबर, अवकाळी पावसामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या चितेत भर पडली आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस; शेतकरी चिंतातूर
जिल्ह्यात पावसाचा लपंडाव अजूनही सुरूच आहे. काही दिवसा आधी खामगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आज आलेल्या पावसामुळे हरभरा, गहू, मका, करडई, अंबा या पिकांना चांगलाच फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात पावसाचा लपंडाव अजूनही सुरूच आहे. आज आलेल्या पावसामुळे भाजी विक्रेत्यांचीही चांगलीच धावपळ झाली. मुसळधार पावसापासून भाजीपाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी विक्रेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली. काही दिवसा आधी खामगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आज आलेल्या पावसामुळे हरभरा, गहू, मका, करडई, अंबा या पिकांना चांगलाच फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा-कोरोनाचे सावट; सैलानी यात्रा रद्दबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केली अधिकृत घोषणा