महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पीडिताच्या वडिलांची आरोपीला मारहाण - मारहाण

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पिडीताच्या वडिलांची आरोपीला मारहाण

By

Published : May 7, 2019, 8:21 PM IST

बुलडाणा- अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलाने घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानुसार आईच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा' म्हणजेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ सपकाळ (२८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पिडीताच्या वडिलांची आरोपीला मारहाण

पीडित मुलाला जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. आपल्या मुलावर झालेल्या अत्याचाराची माहिती झाल्यावर पीडित मुलाच्या वडिलांनी आरोपीला मारहाण केली. मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठवण्यात आले आहे.

याप्रकरणी आरोपीच्या जबाबानुसार पीडिताच्या वडिलांवरही जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details