बुलडाणा- नेहमी होत असलेल्या शेतीच्या वादातून पुतण्याने कुऱ्हाडीने वार करून आपल्या काकाची हत्या केल्याची घटना रविवारी 6 जून रोजी जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अटाळी येथे घडली. याप्रकरणी आरोपी पंकज तिडके याला अटक करून तिच्यावर हिवरखेड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आहे.
काका-पुतण्यांनी यापूर्वी केली होती परस्परविरोधी तक्रार -
खामगाव तालुक्यातील अटाळी येथील 70 वर्षीय रमेश नरिभाऊ तिडके यांची आकोली शिवारात शेती आहे. या शेतीच्या संदर्भात आरोपी पंकज तिडके आणि मृत रमेश नरिभाऊ तिडके यांच्यात नेहमीच वाद होत असे. या वादाबाबत काका-पुतण्यांनी परस्परविरोधी तक्रारीही खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात यापूर्वी केल्या आहेत.