पुणे - नात्यावरचा विश्वास उडून जाणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या अल्पवयीन चुलत पुतणीला पैसे मिळवून देण्याच्या अमिष दिले. याानंतर तिला बुलडाणा येथून पुण्यात आणले आणि देहविक्री करण्यास भाग पाडले. याप्रकरणी आरोपी काका-काकूंना अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. तर पीडित मुलीची सुटका करत तिची रवानगी आई-वडिलांकडे केली.
आरोपींनी बुलढाणा येथून एका अल्पवयीन मुलीला पुण्यात पळवून आले आहे, अशी माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. यानंतर आरोपींचा शोध घेत असताना हडपसर पोलिसांना आरोपी मांजरी बुद्रुक गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या दोघाही आरोपींना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून पीडित मुलीची सुखरूप सुटका केली.