महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : बापरे..! पेट्रोल दिलं नाही म्हणून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये सोडले कोब्रा साप - पेट्रोल पंप न्यूज

दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या युवकांना पेट्रोल देण्यास मालकाने नकार दिला. त्याचा राग आल्याने युवकांनी पेट्रोल पंप मालकाच्या तीन केबिन्समध्ये दोन विषारी कोब्रा नाग व एक धामण जातीचा सोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आता त्या युवकांचा शोध घेत आहे.

two youth left snakes in the petrol pump office as they were not given petrol
VIDEO : बापरे..! पेट्रोल दिलं नाही म्हणून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये सोडले कोब्रा साप

By

Published : Jul 14, 2020, 7:40 AM IST

बुलडाणा- शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, 7 ते 21 जुलै दरम्यान लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये काही वेळ वगळता पेट्रोल पंपही बंद आहेत. दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या युवकांना पेट्रोल देण्यास मालकाने नकार दिला. त्याचा राग आल्याने युवकांनी पेट्रोल पंप मालकाच्या तीन केबिन्समध्ये दोन विषारी कोब्रा नाग व एक धामण जातीचा सोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आता त्या युवकांचा शोध घेत आहे.

बुलडाणा शहरातील मलकापूर रोडवर असलेल्या चौधरी पेट्रोल पंपावर लॉकडाऊन काळात ३ वाजण्याच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोन युवकांनी बॉटलमध्ये पेट्रोल देण्याची मागणी केली. नियमाने बॉटलमध्ये पेट्रोल देता येत नाही तसेच लॉकडाऊनमध्ये दुपारी 3 वाजल्यानंतर पेट्रोल विक्रीला परवानगी नाही. यामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्या युवकांना पेट्रोल देण्यास नकार दिला. तेव्हा चिडलेल्या युवकांनी सोबत आणलेल्या बरणीत असलेले तीन साप पंप मालकाची केबिन, कर्मचाऱ्याची केबिन व कॅश केबिन यामध्ये प्रत्येकी एक-एक साप सोडला. यात दोन विषारी जातीचे कोब्रा आणि एक धामण जातीचा असे तीन साप समावेश होता.

पेट्रोल दिलं नाही म्हणून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये सोडले कोब्रा साप...

पेट्रोल पंप मालक सारिका चौधरी तसेच कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुसऱ्या अन्य सर्पमित्रांना याची माहिती दिली. तेव्हा सर्पमित्र श्रीराम रसाळ यांच्या टीमने सोडलेले तिनही सापाचे रेस्क्यू करून बरणीत कैद केले. या घटनेने पेट्रोल पंप चालकासह कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली असून पोलीस सदर युवकांनाचा शोध घेत आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेचा सर्पमित्रांच्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी निषेध व्यक्त करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा -घरगुती वादातून पती चढला टॉवरवर; तीन तास विनवण्या करून प्रशासनाची दमछाक

हेही वाचा -बियाणे महामंडळावर रविकांत तुपकरांची धडक; शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची देण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details