महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात दोन तरुणांची हत्या; तीन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात - खामगाव पोलीस स्टेशन

विशाल देशमुख (वय ३०, घाटपुरी नाका) आणि सचिन पवार (वय ३३, किसन नगर) असे हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरुण शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घाटपुरी नाका भागात राहतात.

khamgaon murder
खामगावमध्ये दोन तरुणांची हत्या

By

Published : Dec 21, 2019, 9:08 AM IST

Updated : Dec 21, 2019, 9:22 AM IST

बुलडाणा- खामगाव शहरात दोन तरुणांची दगडाने ठेवून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट दिली असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

खामगावमध्ये दोन तरुणांची हत्या

हेही वाचा -बेकायदा पार्किंगचा दंड कमी होण्याची शक्यता, पालिकेकडून लवकरच होणार घोषणा

विशाल देशमुख (वय ३०, घाटपुरी नाका) आणि सचिन पवार (वय ३३, किसन नगर) असे हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरुण शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घाटपुरी नाका भागात राहतात. रात्री दीड वाजता घाटपुरी रोड भागात त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. तरुणांच्या दोन गटात असलेल्या वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा अंदाज आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. गजानन भोंगळ, रवींद्र भोंगळ, अरविंद भोंगळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. मारेकऱ्यांनी दगड आणि चाकूने मृतदेहावर वार केल्याचे दिसून येत आहे. दोघांचे मृतदेह सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. अवैध व्यवसायामधून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती असून शिवाजीनगर पोलीस त्या दृष्टीकोनातून तपास करत आहेत.

Last Updated : Dec 21, 2019, 9:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details