बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पातुर्डा गावाजवळील एका लहान पुलावर मोटार सायकल खड्डयात पडल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. मृत दोन्ही तरुण जवळच्याच कोद्री या गावातील आहेत.
मोटार सायकल खड्ड्यात पडून अपघात; कोद्रीच्या दोघांचा मृत्यू - two youth dead in road accident
संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पातुर्डा गावाजवळील एका लहान पुलावर मोटार सायकल खड्डयात पडल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. मृत दोन्ही तरुण जवळच्याच कोद्री या गावातील आहेत.
हेही वाचा -सिंदखेडराजा येथे जिजाऊ माँ साहेबांचा जन्मोत्सव, मान्यवरांनी केले अभिवादन
शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वानखेड येथे यात्रेला जात असताना पातुर्डा रस्त्यावर काम सुरू असलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात झाला. अपघातात कोद्री येथील तरुण रवींद्र रामकृष्ण वानखडे, प्रक्षिक नंदु वानखेडे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पातुर्डा गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी हजर नसल्याने शेगाव येथे उपचारासाठी नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.