महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा: मलकापुरात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू - two Young man drown in river

सोमवारी दुपारी मलकापूर तालुक्यातील लासुरा येथील विश्वगंगा नदीत तीन तरुण पोहण्यासाठी गेलेल्या 3 पैकी 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मृत तरुण

By

Published : Sep 2, 2019, 7:50 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे छोटे- मोठे बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. या बंधाऱ्यांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन पैकी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सोमवारी मलकापूर तालुक्यातील लासुरा शेतशिवारात घडली असून दीपक जयपालसिह राजपूत (वय, 29) आणि सागर विक्रम डोंगळे (वय, 27) असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

सोमवारी दुपारी मलकापूर तालुक्यातील लासुरा येथील विश्वगंगा नदीत तीन तरुण पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, यामधील लासुरा येथील दीपक जयपालसिह राजपूत आणि सागर विक्रम डोंगळे हे दोन तरुन नदीपात्रात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी नदीपात्रकडे धाव घेतली आणि बुडालेल्या दोन्ही तरुणांना बाहेर काढले. यानंतर या तरुणांना मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना यावेळी मृत घोषित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details