महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तबलिगी रुग्णाच्या एकाच स्वॅबचे दोन चाचणी अहवाल; एक कोरोना निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह

बुलडाण्यात एका 75 वर्षीय रुग्णाच्या अहवालामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. या रुग्णाच्या एकाच स्वॅब नमुन्यातून कोरोनाचे दोन वेगवेगळे चाचणी अहवाल अकोल्यावरून प्राप्त झाले आहे, असून एक अहवाल पॉझिटिव्ह तर एक अहवाल निगेटिव्ह आला आहे.

corona
कोरोना

By

Published : Apr 29, 2020, 7:26 AM IST

बुलडाणा - नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील असलेल्या आणि सध्या बुलडाण्यात अडकलेल्या तबलिगी जमातच्या 11 सदस्याच्या कोरोना चाचणीत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यातील एका 75 वर्षीय रुग्णाच्या अहवालामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. या रुग्णाच्या एकाच स्वॅब नमुन्यातून कोरोनाचे दोन वेगवेगळे चाचणी अहवाल अकोल्यावरून प्राप्त झाले असून एक अहवाल पॉझिटिव्ह, तर एक अहवाल निगेटिव्ह आला आहे.

या प्रकरणाची माहिती देताना बुलडाण्यावरुन ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी वसीम शेख

26 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पहिला अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. तर 27 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी दुसऱ्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. एकाच स्वॅब नमुन्यावरून दोन कोरोनाचे वेगळे अहवाल आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे कोरोनासंदर्भात चाचणी करणाऱ्या लॅबमध्ये जबाबदारीने कोरोनाची चाचणी होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर जिल्हा प्रशासनाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एखाद्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळला तर त्या ठिकाणचे प्रशासन अलर्ट होते. रुग्णाच्या आणि आजूबाजूच्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जातात. मात्र, ज्या लॅबमध्ये कोरोना संदर्भात चाचणी केली जाते ती जबाबदारीने केली जात आहे का? असा प्रश्न बुलडाण्यातील नागरिकांना पडला आहे. एकाच स्वॅबवरून दोन वेगवेगळ्या तज्ञांनी केलेल्या चाचणीचे अहवाल वेगवेगळे आल्याने गोंधळ झाला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details