बुलडाणा -परराज्यातील दारू औरंगाबादकडे जात असताना मलकापूर शहर पोलिसांनी ५५ हजार रुपयांच्या दारूसह तिघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी २३ मार्चच्या रात्री करण्यात आली. विशेष म्हणजे दारू तस्करी लग्नाची कार असल्याचे भासवून केली जात होती.
संचारबंदीतही लग्नाच्या कारमध्ये दारू तस्करी करणारे दोन जण ताब्यात; कारसह 55 हजार रुपयांची दारु जप्त - कोरोना विषाणू बद्दल बातमी
परराज्यातील दारू औरंगबादकडे जात असतांना मलकापूर शहर पोलिसांनी ५५ हजार रुपयांचिया दारुसह तिघांना ताब्यात घेतले. या बाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
संचार बंदीतही लग्नाच्या कारमध्ये दारुची तस्करी करणारे दोन जण ताब्यात; कारसह 55 हजार रुपयांची दारु जप्त
संपुर्ण राज्यात संचारबंदी लागु असतांना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील बस स्थानक परिसरात सोमवारी नाकाबंदी दरम्यान पोलीसांनी (MH 20 FG 4789) मारुती ईर्टिका कारला अडवून तपासणी केली. यावेळी मनोज हिरालाल सोने, सचिन नारायण रमंडवाल (रा. औरंगाबाद) या दोघाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कारसह ८ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात ए. एस . आय नरेंद्र सिंग ठाकूर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप नीरीक्षक गणेश शिंदे करत आहेत.