महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हृदयविकाराच्या झटक्याने दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू; बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातील घटना - ह्रदयविकार

मेहकर तालुक्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा ह्रदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला आहे. एएसआय प्रकाश कंकाळ आणि एएसआय वसंता काळदाते असे या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

हृदयविकाराच्या झटक्याने दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू

By

Published : Apr 22, 2019, 9:22 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील २ पोलीस अधिकाऱ्यांचा सेवेवर असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

हृदयविकाराच्या झटक्याने दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू

मेहकर तालुक्यातील एएसआय प्रकाश कंकाळ हे जानेफळ पोलीस स्थानकात तर एएसआय वसंता काळदाते हे लोणार पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. हे दोन्ही अधिकारी कर्तव्यावर असताना शनिवारी २० एप्रिलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना मेहकर येथील मल्टी स्पेशालिटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कंकाळ यांच्यावर सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे तर काळदाते यांच्यावर मेहकर येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details