बुलडाणा -चिखली-अमडापूर मार्गावरील कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज (बुधवारी १५ जानेवारी) सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांना उपचारार्थ अकोला येथे हलवण्यात आले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
चिखली-अमडापूर मार्गावरील कार अपघातात दोन जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Buldana Police News
चिखली-अमडापूर मार्गावर कार अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला,तर तिघे गंभीर जखमी झाले.
पुणे येथील काही कामानिमित्त ते (एम-एच-३०-ए-टी-३००९) क्रमांकाच्या कारने खामगाव तालुक्यातील कांचनपूर या आपल्या मूळ गावी निघाले होते. दरम्यान, बुधवारी पहाटे सातच्या अमडापूरनजीक कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरुपे (वय५०) व प्रीती विलास बहुरुपे (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश प्रल्हाद बहुरुपे (वय ६० ), स्रेहल श्रीकांत भोजने (वय २७ ), विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष ) असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय टेकाळे, परमेश्वर शिंदे, तडवी, वैद्य यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन जखमी व मृतकांना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात पाठवले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.