महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण; तर एका बाधिताची कोरोनावर मात - बुलडाण्यातील कोरोनाबाधित रुग्णाला सुट्टी

कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधिताने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या कोरोनाबाधित रुग्णाला सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात पुन्हा २ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून आजपर्यंत जिल्ह्यात ३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Hospital
कोरोनामुक्त रुग्णाला सुट्टी देताना अधिकारी

By

Published : May 20, 2020, 7:23 PM IST

बुलडाणा- खामगाव येथील कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधिताने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या कोरोनाबाधित रुग्णाला सुट्टी देण्यात आली. पण त्यापाठोपाठ नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी धडकली. जिल्ह्यात पुन्हा २ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून आजपर्यंत जिल्ह्यात ३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर २४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.

बुलडाण्यात पुन्हा आढळले 2 कोरोनाबाधित रुग्ण; तर एका बाधिताची कोरोनावर मात

नव्या २ कोरोना रुग्णांमध्ये शेगावात आढळलेल्या कोरोनाबाधित कामगाराची पत्नी आणि मोताळा तालुक्यातील आव्हा येथील २२ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. आव्हा येथील २२ वर्षीय तरुण मुंबईहून आला असल्याचे सांगण्यात येत आहे. शेगाव, खामगाव आणि जळगाव जामोद या शहरांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते.

जळगाव जामोद येथील रुग्ण हा मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर शहरात जाऊन आल्याने बाधित झाला आहे. त्याच्यावर खामगाव येथील कोविड १९ रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत होते. त्याचे रिपोर्टही निगेटीव्ह आल्याने त्याला आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. दुसरीकडे शेगाव येथील नगरपालिकेचा सफाई कर्मचारी हा पॉझिटिव्ह आढळल्याने त्याचेवर शेगाव येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कातील 29 व्यक्तींचे रिपोर्ट्स आज प्राप्त झाले असून यामध्ये सफाई कामगारांची पत्नीही पॉझिटिव्ह आढळल्याने आता जिल्ह्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details