बुलडाणा- शेगाव-खामगाव रस्त्यावरील माऊली कॉलेज जवळ स्कॉर्पिओ आणि दुचाकीमध्ये बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झाले असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला शेगावातील सईबाई मोटे शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लखन मरीभान बावणे आणि मरीभान हिरामन बावणे अशी अपघातामधील मतांची नावे आहेत.
शेगाव-खामगाव रोडवर स्कॉर्पिओच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार; एक जखमी - अपघातात दोघे ठार
शेगाव-खामगाव रस्त्यावरील माऊली कॉलेज जवळ स्कॉर्पिओ आणि दुचाकीमध्ये बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ (वाहन क्र. एम.एच.28-3349) या चारचाकीने खामगावकडून शेगावकडे येणाऱ्या दुचाकीला (एम.एच 28 एवी.7265) समोरून जोरदार धडक दिली. घटनेनंतर स्कॉर्पिओ चालक फरार झाला आहे.
स्कॉर्पिओ चालक फरार -
शेगाव-खामगाव रस्त्यावरील माऊली कॉलेजवळ स्कॉर्पिओ (वाहन क्र. एम.एच.28-3349) या चारचाकीने खामगावकडून शेगावकडे येणाऱ्या दुचाकीला (एम.एच 28 एवी.7265) समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये लखन मरीभान बावणे व मरीभान हीरामन बावणे (दोन्ही रा शिवाजीनगर शेगांव) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शेख रज्जाक शेख रहेमान (वय 55 वर्ष रा. बालाजी फैल शेगाव) हे जखमी झाले. स्कॉर्पिओ चालक फरार झाला आहे.
घटनेची तात्काळ माहिती मिळताच खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच साहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह विच्छेदनाकरिता शेगाव शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी जखमीलाही उपचारासाठी शेगाव येथ हलवण्यात आले. अपघातातील स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आहे. तर फरार झालेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.