बुलडाणा- मॉर्निंग वॉकला जाणार्या दोन महिलांना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला असून वाहन चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झाला आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले, चालक फरार - dead
मॉर्निंग वॉकला जाणार्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले आहे. यात दोन्ही महिलांचा जागिच मृत्यू झाला आहे.
दोन वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने चिरडले
हिराबाई ज्ञानदेव आगाशे (वय 65) आणि आशाबाई व्यवहारे (वय 67) असे मृत महिलांची नावे आहेत. त्या बुलडाणा शहरातील मुट्ठे ले आउट येथे राहणाऱ्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून महिलांचे मृतदेह बुलडाणा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
Last Updated : Jul 15, 2019, 1:33 PM IST