बुलडाणा -ट्रक व दुचाकी अपघातात एका व्यक्तीसह त्याच्या नातवाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२५ जुलै) सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास जाफराबाद मार्गावर बायपास चौफुलीवर घडली. या अपघातात चिमुकल्याचा मृतदेह छीन-विछिंन्न कंबरेपासून झाला होता. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ट्रक ताब्यात घेतला असून चालक फरार आहे.
बुलडाणा: ट्रक दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू एक गंभीर, मृतांमध्ये चिमुकल्याचा समावेश - जाफराबाद बायपास
पोलिसांनी मृताचा पुतण्या अब्दुल शकील अब्दुल शफी (रा. अंजुमन चौक, धाड) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ट्रक ताब्यात घेतला असून चालक फरार आहे.
चिखली तालुक्यातील धाड येथील अब्दुल मुजीब अब्दुल मजीद हे सूनेची प्रसुती झाल्याने आपल्या पत्नी व नातवाला घेऊन दुचाकीने निघाले होते. सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास देऊळगाव राजाजवळ जाफराबाद वळण रस्त्याच्या चौफुलीवर जालन्याला जाण्यासाठी त्यांनी आपली दुचाकी वळवली. याचवेळी चिखली येथून जालन्याकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच २० एटी २४७२ ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात नातू शेख समीर शेख तोफिक (वय ७) जागीच ठार झाला. तर शेख मुजीब अब्दुल मजिद (वय ५५) व त्यांची पत्नी नजमा बी अब्दुल मुजीब (वय ४७) या गंभीर जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार एसआर पाटील तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघात एवढा गंभीर होता की पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला. अपघातातील गंभीर जखमी पती-पत्नीस प्रथम उपचार करून देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी जालना येथे खासगी रुग्णवाहिकेद्वारे पाठविले. मात्र, शेख मुजीब यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर गंभीर जखमी नजमा बी यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृताचा पुतण्या अब्दुल शकील अब्दुल शफी यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.