महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

literary conference : दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन; विविध कार्यक्रमाचे आयोजन - State Level Literary Conference at Buldhana

बुलढाणामध्ये दिन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले ( two days state level literary conference ) आहे. आंबेडकरी साहित्य अकादमीची स्थापना बुलढाणा शहरात २६ ऑगस्ट २०१८ रोजी झाली होती. त्याची चार वर्ष पूर्ण होत आहेत.

literary conference
राज्यस्तरीय साहित्य संमेलन

By

Published : Dec 9, 2022, 4:12 PM IST

बुलढाणा : आंबेडकरी साहित्य अकादमी बुलढाणाच्यावतीने गर्दे हॉल येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले ( two days state level literary conference ) आहे. आंबेडकरी साहित्य अकादमीची स्थापना बुलढाणा शहरात २६ ऑगष्ट २०१८ रोजी झालेली असून गेल्या चार वर्षात हया संस्थेने अनेक उपक्रमशील कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून दि.२४/१२/२०२२ (शनिवार) व दि. २५/१२/२०२२ (रविवार) ला दोन दिवशीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले ( State Level Literary Conference at Buldhana )आहे.

राज्यस्तरीय साहित्य संमेलन

मान्यवरांची उपस्थिती :हया संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यीक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर नागपूर हे भुषविणार आहेत तर उद्घाटक म्हणून सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या कोरो, राईट टू.पी, संविधान संवर्धन समितीच्या पदाधिकारी व ज्यांना बी.बी.सी च्या वतीने मोस्ट इंन्सिरेशनल विमेन ऑफ ४ वर्ल्ड पुरस्काराने सन्मानीत झालेल्या मुमताज शेख उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भिमराव जाधव संस्थापक अध्यक्ष श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था मोताळा हे आहेत. तसेच रविंद्र इंगळे चावरेकर, डॉ. सदानंद देखमुख, डॉ.गोविंद गायकी हयांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच दोन दिवसात चार विविध परिसंवादात, सुप्रसिध्द विचारवंत जयदेव डोळे, औरंगाबाद शमसुद्दीन तांबोळी, पुण, माधव सरकुंडे यवतमाळ डॉ.प्रतिभा अहिरे, मराठवाडा, प्रशांत नंजारे, अ‍ॅड जयमंगल धनराज, संध्या रंगारी शाम मुडे, प्रकाश राठोड इत्यादी साहित्यीक विचार मांडणार आहेत.

विविध कार्यक्रमांनी समारोप : तसेच गझल मुशायऱ्यासाठी म.भा.चव्हाण, पुणे, मसुद पटेल, पुणे, डॉ. रविप्रकाश चापके, हे गझलकार उपस्थित राहणार असून शाहीर सुरेशकुमार वैराळकर पुणे हयांच्या गझलरंग हया प्रसिध्द कार्यक्रमाने समारोप होणार आहे. वरील साहित्य संमेलनात, संविधान रॅली, शाहीरी पोवाडा, उद्घाटन चार परिसंवाद, गझल मुशायरा कविसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी साहित्य रसिक, विचारवंत व नागरीकांनी हया कार्यक्रमाला सहकार्य करुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन डॉ. विजयालक्ष्मी वानखेडें अध्यक्ष,आंबेडकरी साहित्य अकादमी यांनी केले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details