महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थरारक... बुलडाण्यात शेतीच्या वादातून दोन चुलत भावांची चाकूने भोकसून हत्या - शेतीच्या वादातून भावाची हत्या बुलडाणा

शेतीच्या वादातून चुलत भावाने दोन चुलत भावांची चाकूने निर्घृण हत्या केल्याची आणि अन्य काहींना जखमी केल्याची थरारक घटना शुक्रवारी बुलडाण्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीतील सिंदखेड लपाली येथे घडली.

Brother kills brother Buldana
भावाने भावाची हत्या केली बुलडाणा

By

Published : Jun 13, 2020, 3:29 PM IST

बुलडाणा - शेतीच्या वादातून चुलत भावाने दोन चुलत भावांची चाकूने निर्घृण हत्या केल्याची आणि अन्य काहींना जखमी केल्याची थरारक घटना शुक्रवारी बुलडाण्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीतील सिंदखेड लपाली येथे घडली. सुभाष रामलाल मोरे (50) आणि त्र्यंबक रामलाल मोरे (48) अशी मृतांची नावे आहेत. तर सुनील सुभाष मोरे, अनिल तुळशीराम मोरे अशी जखमींची नावे आहेत. जखमींना बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. गजानन मोरे (45), उमेश गजानन मोरे, मंगेश गजानन मोरे अशी आरोपींची नावे आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बुलडाण्यात शेतीच्या वादातून चुलत भावाने दोन चुलत भावांची चाकूने निर्घृण हत्या केली...

आरोपी सुभाष रामलाल मोरे, त्र्यंबक रामलाल मोरे आणि गजानन मोरे व मृत उमेश गजानन मोरे, मंगेश गजानन मोरे यांची सोनबरड शिवारात शेती आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे शेतातील काही बाबींवरुन वाद सुरु होता. यावेळी आरोपींनी शेताचा सामाईक बांध फोडल्याने मृत सुभाष व त्र्यंबक मोरे यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरले होते. त्यावरुन सुभाष रामलाल मोरे व त्यांचा मुलगा सुनिल मोरे हे आरोपींला सांगण्यासाठी गेले असता, आरोपींने त्यांच्यासोबत वाद घातला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच कारणावरुन त्र्यंबक मोरे, काका मृतक सुभाष मोरे, चुलत भाऊ सुनिल मोरे आणि अनिल मोरे हे आरोपींस समजावण्यास गेले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली.

हेही वाचा...'निसर्गा'ने केलं बेघर आता वन विभागाचीही आडकाठी; २५ आदिवासी कुटुंब उघड्यावर...

याच वादातून आरोपी उमेश याने घरातुन चाकु आणला. दरम्यान दुसरे आरोपी आरोपी मंगेश उर्फ प्रसाद याने त्र्यंबक मोरे यांना पकडले आणि आरोपी गजानन मोरे याने सुभाष मोरे यांना पकडले. त्यानंतर आरोपी उमेश याने दोघांचे पोटात चाकु खुपसुन त्यांची हत्या केली. तर चुलत भाऊ सुनिल आणि अनिल यांच्याही पोटात उमेशने चाकु खुपसला व त्यांना गंभीर जखमी केले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, धामणगांव बढे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर तसेच कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आणि आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details