महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादळी वाऱ्याने घरावर झाड कोसळून मातेसह २ चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत - two son

बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी लावली. खामगावमध्ये संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह सतत २ तासापासून पाऊस सुरू होता. त्यांच्या घराशेजारीच निंबाचे जुने झाड असून आज झालेल्या वादळी वाऱ्याने हे निंबाचे झाड त्यांच्या घरावर कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

निंबाचे झाड घरावर कोसळून आईसह २ चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू

By

Published : Jun 22, 2019, 10:18 PM IST

बुलडाणा - खामगाव तालुक्यातील घाटपुरीतील आनंदनगर येथे वादळी वाऱ्यामुळे घरावर निबांचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आईसह दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आई शारदा गुणवंत हिरडकर (वय २८) सुष्टी गुणवंत हिरडकर (वय ३) ऋषिकेश गुणवंत हिरडकर (वय २) असी त्या मायलेकरांची नावे आहेत. या तिघांचाही मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली. खामगावमध्ये संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह सतत २ तास पाऊस सुरू होता. दरम्यान, तालुक्यातील घाटपुरी येथील आनंदनगर येथे गुणवंत हिरडकर यांचे पत्र्याच्या शेडवर घराशेजारचे निंबाचे जुने झाड कोसळले. ही घटना आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

झाड कोसळले त्यावेळी हिरडकर यांच्या घरात असलेले त्यांची पत्नी शारदा मुलगी सुष्टी आणि मुलगा ऋषिकेश हे तिघेही दबले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ग्रामस्थांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तर नागरिकांनी घटनास्थळी घाव घेतली. घरावर पडलेले झाड क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढले. झाडाखाली दबलेले आई,मुलगी-मुलाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुणवंत हिरडकर हे हॉटेल व्यावसायिक असल्याने ते कामावर होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details