महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनी तणावातून घेतला गळफास - two boys suicide buldana

बुलडाणा शहरात चिखली रोडवरील हाजीमलंग दर्ग्याच्या बाजूला शासकीय बाल निरीक्षण व बाल सुधारगृह आहे. येथील दोन युवकांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

galfas
गळफास

By

Published : Dec 5, 2020, 10:35 AM IST

Updated : Dec 5, 2020, 5:01 PM IST

बुलडाणा- येथील शासकीय निरीक्षण व बालगृहातील दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनी टॉवेल व बेडशिटच्या साहाय्याने लोखंडी अ‍ँगलला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज (शनिवारी) सकाळी सात वाजेदरम्यान उघडकीस आली. मंगेश डाबेराव (वय-15) आणि गजानन बांगरे (वय-17) अशी आत्महत्या केलेल्या बालकांची नावे आहेत. मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या केल्याची घटना शासकीय निरीक्षण व बाल गृहामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तर या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक याबाबत अधिक माहिती देताना.

शेगांव येथील घरफोडी प्रकरणात होते दोघेही विधी संघर्षग्रस्त -

मंगेश डाबेराव आणि गजानन बांगरे हे शेगाव येथील होते. शेगाव शहरामधील सरस्वती महाविद्यालयाजवळ झालेल्या घरफोडीमध्ये ते सापडले होते. यानंतर विधी संघर्षग्रस्त म्हणून त्यांना २३ नोव्हेंबरला बालन्याय मंडळाच्या आदेशाने शहरातील शासकीय निरीक्षण व बालगृहामध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांनी टॉवेल व बेडशीटच्या साहाय्याने टिनाखाली असलेल्या लोखंडी अ‍ँगलला गळफास घेत आत्महत्या केली. सकाळच्या सुमारास या आत्महत्या केलेल्या बालकांसोबत असलेल्या विधी संघर्षग्रस्त रायपूर येथील नितीन जमदाडे याने हा प्रकार बघितला व आरडाओरड केला. यानंतर या घटनेची माहिती बुलडाणा शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोस्टचे ठाणेदार प्रदिप साळुखे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

दरम्यान, जिल्हा बालन्याय मंडळाच्या प्रमुख आणि सदस्यांनी, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अरविंद रामरामे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर हे प्रकरण बुलडाणा पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू हे करीत आहे.

मानसिक तणावाखाली आत्महत्या -

दोन्ही बालकांनी शासकीय निरीक्षण व बाल गृहामधून पडून जाण्याचा योजना आखली होती. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. आपल्याला येथून कोणीच सोडवणार नाही, आपल्याला येथून पळता येणार नाही, म्हणून आपल्याला जीवनभर येथेच राहावे लागणार या मानसिक तणावातून दोघांनी आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -मांत्रिक बाबाचा सल्ला आणि तिघांची गळफास घेऊन आत्महत्या, हे होते कारण...

हेही वाचा -अहमदनगर : प्रेमी युगुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Last Updated : Dec 5, 2020, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details