महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील मंदिरांनी गजानन महाराज संस्थानचा आदर्श घ्यावा - तुप्ती देसाई - ideal

राष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या शनि शिंगणापूर, मुंबईचा हाजी अली दर्गा, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलने करणाऱ्या तृप्ती देसाईंनी शनिवारी शेगावला जावून गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

देसाई

By

Published : Mar 10, 2019, 9:37 AM IST

बुलडाणा - शेगाव येथील गजानन महाराज संस्थेकडून भक्तांना मिळणाऱ्या सुख सुविधा आणि मिळणारी आपुलकीची वागणूक ही प्रशंसनीय आहे. हे कार्य राज्यभरातील अनेक देवस्थान करू शकतात, मात्र तशी मानसिकता आवश्यक आहे, असे म्हणत या संस्थानाचा राज्यभरातील मंदिरांनी आदर्श घ्यावा, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे.

देसाई

राष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या शनि शिंगणापूर, मुंबईचा हाजी अली दर्गा, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलने करणाऱ्या तृप्ती देसाईंनी शनिवारी शेगावला जावून गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिरात फेरफटका मारला. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित महिला मेळाव्याला मार्गदर्शनासाठी त्या आल्या होत्या. यावेळी शेगाव संस्थांकडून भक्तांना विशेषतः महिला वर्गाला सेवाकरींकडून मिळणारी आपुलकीची वागणूक पाहून देसाई यांनी संस्थान प्रशासनाचे आभार मानले.

बऱ्याच देवस्थानांमध्ये लाखो भक्त येत असतात. येणारा निधीही मोठा असतो. मात्र, सुविधा हव्यातशा नसतात. शेगावच्या संस्थानामध्ये असे पाहायला मिळाले, की भक्तांनी फक्त प्रवास तिकीट काढून या आणि तुम्ही येथे आलात, की तुम्हाला परत गाडीत बसेपर्यंत १ रुपयाही खर्च येत नाही. येथील स्वच्छता, पारदर्शकता आणि विशेषतः महिलांच्या बाबत या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाते, यावर मी खूप समाधान आहे. अशा सुविधा राज्यातील सर्वच देवस्थानमध्ये होणे गरजेचे आहे. याचाच आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थानच्यावतीने देसाई यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details