महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा : देऊळगावराजा बायपास मार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, वृद्ध महिला ठार तर 25 प्रवासी जखमी - buldana accident news

देऊळगावराजा शहराजवळील बायपासवर एसटी बस आणि ट्रकचा समोरा-समोर अपघात झाल्याची घटना आज सोमवारी घडली. अपघातामध्ये एक वृद्ध महिला जागीच ठार झाली.

accident
बस आणि ट्रकचा भीषण अपघात

By

Published : Aug 23, 2021, 3:28 PM IST

Updated : Aug 23, 2021, 5:54 PM IST

बुलडाणा -जिल्ह्यातील देऊळगावराजा शहराजवळील बायपासवर एसटी बस आणि ट्रकचा समोरा-समोर अपघात झाल्याची घटना आज सोमवारी घडली. अपघातामध्ये एक वृद्ध महिला जागीच ठार झाली असून, बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 5 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अपघात एवढा भीषण होता की, एसटी बसची डाव्या साईडची मागची बाजू फाडली आहे.

देऊळगावराजा बायपास मार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात

हेही वाचा -पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोण्याच्या संशयावरून ७ जणांना बांधून मारहाण, या गावात तणावाचे वातावरण

जालना येथून यवतमाळकडे एसटी बस जात होती. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरातील बायपासजवळ जात असताना, ट्रक क्रॉस करत असताना एक साईड पूर्णपणे फाडत नेली. या अपघातात 1 वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, ड्रायव्हर साईडला बसलेले 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन या सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढले. त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले.

गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ट्रक पलटी झाल्याने 13 मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच परत हा एक मोठा अपघात घडला.

हेही वाचा -परमबीर सिंग गायब? सुटीवर असलेले परमबीर सिंग गेले कुठे? चर्चांना उधाण

Last Updated : Aug 23, 2021, 5:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details