बुलडाणा- झाडे लावा झाडे जगवा, ही काळाची गरज झाली आहे. तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ झाली आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचे आगमन अजूनही झाले नाही. या सर्व गोष्टींची जान ठेवत खामगाव येथील लॉयन्स क्लबच्यावतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी 'मिलकर वसुंधरा बचाव'चा नारा देत शहरातील विविध कार्यक्रमात सहभागी होत नागरिकांना झाडे वाटप केले. तसेच त्यांना त्या झाडांचे संगोपन करण्याचे मह्त्तव पटवून दिले.
'मिलकर वसुंधरा बचाव'चा नारा देत लॉयन्स क्लब खामगावच्यावतीने विविध कार्यक्रमात वृक्षवाटप - लॉयन्स क्लब
मंगळवारी लॉयन्स क्लबच्या सदस्यानी खामगाव येथील एका लग्न समरंभात सहभागी होऊन लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना झाडे देत त्यांना संगोपनाचे महत्तव पटवून दिले.
बुलडाणा
मंगळवारी लॉयन्स क्लबच्या सदस्यानी खामगाव येथील एका लग्न समरंभात सहभागी होऊन लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना झाडे देत त्यांना संगोपनाचे महत्तव पटवून दिले. या वर्षी 5 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करणार असल्याचे लॉयन्स क्लबचे अध्यक्ष किशोर गरड यांनी सांगितले.