बुलडाणा -मेहकर तहसील कार्यालय परिसरातील अनेक दिवसांपासून कुजलेले झाड मंगळवारी अचानक तीन जणांच्या अंगावर कोसळले. या घटनेत तीघे जण जखमी झाले. यामध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीचा समावेश असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अशोक वानखेडे, असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना उपचाराकरिता खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
थेट अंगावर पडले झाड-
मेहकर तहसील कार्यालयात एक झाड खूप दिवसापासून कुजलेल्या अवस्थेत होते. तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेले अशोक वानखेडे हे आपल्या दुचाकीसह अन्य दोन जनासोबत कार्यालयाच्या परिसरात या झाडाच्या काही अंतरावर उभे होते. दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक हे कुजलेले या तिघांच्या अगांवर पडले. सुदैवाने या अपघात जीवितहानी झाली नाही. मात्र, अशोक वानखेडे यांच्या डोक्यावर दुखापत झाली आहे. शिवाय अन्य दोघे ही जखमी झाले आहे. गंभीर जखमी झालेले अशोक वानखेडे यांना मेहकर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांसह महाआघाडीचे नेते राज्यापालांच्या भेटीला.. 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा ?