बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून भारतीय रेल्वे सेवा बंद होती. मात्र, अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी गैर श्रमिक नियमित रेल्वे सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने मलकापूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री पहिली प्रवासी गाडी 'मुबंई-हावडा मेल' आली. त्यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
अडीच महिन्यानंतर मलकापूर रेल्वे स्थानकावर थांबली पहिली प्रवासी गाडी; प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद - mumbai howrah mail news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून भारतीय रेल्वे सेवा बंद होती. मात्र, अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी गैर श्रमीक नियमित रेल्वे सुरू करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.
हेही वाचा...स्थलांतरित मजुरांना प्रत्येकी दहा हजार रुपये द्या; ममता बॅनर्जींची मागणी..
कोरोनामुळे अनेक प्रवासी वेगवेगळ्या राज्यात अडकून पडले होते. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचेही काही प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले होते. मंगळवारी रेल्वे प्रशासनाकडून पहिल्या रेल्वे प्रवासी गाडीला बुलडाण्याच्या मलकापूर येथे थांबा देण्यात आला होता. हावडा मुंबई मेल ही गाडी रात्री सव्वा आठ वाजता स्थानकावर थांबली होती. त्यावेळी रेल्वेतून स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. या ठिकाणी प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. त्याचप्रमाणे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून प्रवाशांना सोडण्यात आले. रेल्वे सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे अडकलेले प्रवासी गावी परत येताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.