बुलडाणा -आज सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने काळी पिवळी गाडीला धडक दिल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा-वडनेर मार्गावरील वडी येथे भीषण अपघातात घडला. या अपघातात पती-पत्नीसह तिघे जण ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहे.
कंटेनरने काळी-पिवळीला दिली धडक-
काळी पिंवळी गाडी नांदुऱ्याकडून मलकापूरकडे प्रवासी घेवून जात असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने काळी पिवळी गाडीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात सुनील सुभाष तायडे व अर्चना सुनील तायडे रा.वडनेर हे दोघे तसेच पती-पत्नी व भगीरथाबाई विठ्ठल दळवी रा.वडनेर या तिघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. तर आशा पुंडलीक जंगले रा.काटी, जय अनंतराव जंगले रा. काटी, रामचंद नथ्थू सातव रा.वडनेर, पुष्पा गजानन इंगळे रा.वडनेर, श्रेया सुनील तायडे, तनिष्का रमेश होनाडे, रियांश सुनील तायडे, कमल दिनकर पांडे, बेबाबाई राजाराम सातव दोन्ही रा.वडनेर असे ९ प्रवासी जखमी झाले आहे.