बुलडाणा - संग्रामपूर येथील स्मशानभूमीजवळ राज्य परिवहन बसला ट्रक्टरने धडक दिल्याची घटना सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. ही बस सोनाळावरून जळगाव जामोद मार्गे बुलडाणा येथे जात होती. यातील गंभीर जखमींना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बस (एमएच 40 एन 9489) सोनाळाहून बुलढाणा येथे जात होती. तर ट्रॅक्टर रेती घेण्यासाठी वरवट बकालकडे जात होते. यावेळी बस आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. ही घटना शनिवार सकाळी संग्रामपूर जवळ घडली. यामध्ये दोन्ही वाहनाच्या चालकांसह ७ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील 5 जणांना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.