बुलडाणा - नव्या वर्षाच्या स्वागताचा माहोल तयार झाला असून सरत्या वर्षाला निरोपासह नव वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी विशेष करून 'जंगल सफारीचे' ( Gyanganga Sanctuary ) नियोजन सुरू झाले आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारीसाठी ( Jungle Safari in Gyanganga Sanctuary ) डिसेंबर महिन्यात आतापर्यंत १९ जिप्सी गाड्या बुक झाल्या आहेत...
Happy New Year 2023 : "ज्ञानगंगा" जंगल सफारीसाठी १९ जिप्सी बुक; नव्या वर्षाचे पर्यटकांकडून स्वागत - Gyan Ganga Jungle Safari
नव वर्षाचे स्वागत ( Happy New Year 2023 ) करण्यासाठी सर्वच जण तयार झाले आहेत. नविन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी बुलडाण्यातील ज्ञानगंगा" जंगल ( Gyanganga Sanctuary ) सफारीसाठी१९ जिप्सी बुक केल्या आहेत.
ज्ञानगंगा अभयारण्यात थर्टी फर्स्ट - बुलडाणा शहरालगतच्या ऐतिहासिक व धार्मिक वास्तूस्थळी सहली, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटीचे बेत आखल्या जात असून, निसर्ग सौंदर्याने नटलेले ज्ञानगंगा अभयारण्य जिल्ह्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकांना सुद्धा खुणावत आहे. सरत्या वर्षाला निरोपासह नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बुलडाणेकरांनी नियोजन सुरू केले आहे. अनेकांनी हॉटेलमध्ये थर्टी फर्स्ट करण्याचे ठरविले तर पर्यावरण प्रेमींनी निसर्गाच्या सानिध्यात नववर्षाचे स्वागत करण्याचा बेत आखला आहे.
जंगल सफारीच्या माध्यमातून १३ लाखांचा महसूल -जैवविविधतेने नटलेले ज्ञानगंगा अभयारण्य अनेकांना भुरळ घालत असल्याने बुकिंग करण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ असते.आज ज्ञानगंगाची बुकिंग फुल होणार आहे. गेल्या दीड वर्षात वन्यजीव विभागाला जंगल सफारीच्या माध्यमातून १३ लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. २२ हजार हेक्टर क्षेत्रात विखुरलेल्या या अभयारण्यात बीबट, चितळ, सांभार, हरीण,निलगाय, सायाळ, मोर आदीं वन्यजीव आढळून येतात. त्यामुळे जंगल सफरीचा मनमुराद आनंद लुटला जातो. विशेष म्हणजे यात नौकाविहरचां आनंद लुटता येतो हे विशेष.