बुलडाणा - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहराचा आजचा (रविवार) आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आठवडी बाजारामध्ये शुकशुकाट आहे. याचा आढावा घेतलाय आमचे बुलडाण्याचे जिल्हा प्रतिनिधी वसीम शेख यांनी....
कोरोनामुळे बुलडाण्याचा आठवडी बाजार रद्द, जिल्हा प्रशासनाचा निर्णय, - बुलडाणा शहराचा आठवडी बाजार र
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहराचा आजचा (रविवार) आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

बुलडाणा शहराचा आठवडी बाजार हा दर रविवारी शहराच्या जयस्थंभ चौक, महात्मा फुले मार्केट, बाजार तळ या मध्यवर्ती भागात भरत असतो. या बाजारात बुलडाण्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच हा बाजार जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने शहारालगत असलेल्या खेड्यावरचे लोक येथे भाजीपाल्याची खरेदी-विक्री करण्यासाठी शेतकरी व व्यापारी वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आज आठवडी बाजारातील होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा आठवडी बाजार रद्द करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. बाजारात आज शुकशूकाट असल्याचे पाहायला मिळाले.