महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तीन वृक्षांच्या कत्तलीप्रकरणी अखेर मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल

22 मार्च रोजी सकाळच्या सुमारास बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौक येथील तीन वृक्ष विनापरवानगी कापण्यात आले होते. ते वृक्ष बुलडाण्यातील डिजिटल फलक व्यावसायिकाने कापायला सांगितल्याचे समोर आले आहे. कैलास पसरटे असे या डिजिटल फलक व्यवसायीकाचे नाव असून, वृक्ष फलकाला अडथळा ठरत असल्याने त्याने त्या वृक्षांची कत्तल केली.

By

Published : Apr 2, 2021, 11:00 PM IST

वृक्षांच्या कत्तलीप्रकरणी गुन्हा दाखल
वृक्षांच्या कत्तलीप्रकरणी गुन्हा दाखल

बुलडाणा - 22 मार्च रोजी सकाळच्या सुमारास बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौक येथील तीन वृक्ष विनापरवानगी कापण्यात आले होते. ते वृक्ष बुलडाण्यातील डिजिटल फलक व्यावसायिकाने कापायला सांगितल्याचे समोर आले आहे. कैलास पसरटे असे या डिजिटल फलक व्यवसायीकाचे नाव असून, तो नगर परिषदेकडून वार्षिक करारनाम्यानुसार शहरात डिजिटल फलक लावण्याचा व्यवसाय करतो. डिजिटल फलकाला अळथडा निर्माण होत असल्याने हे तिनही वृक्ष कापल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणी कैलास पसरटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहिरातीच्या फलकावर वृक्षाच्या फांद्या येत असल्याने फलक झाकले जात होते. यामुळे अनेकवेळा फांद्या कापण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे, मात्र यावेळी थेट तीनही वृक्षांची कत्तल करण्यात आली.

वृक्षांच्या कत्तलीप्रकरणी गुन्हा दाखल

22 मार्च रोजी बुलडाण्याच्या जयस्तंभ चौकात तीन वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणी नगर पालिकेचे वृक्ष अधिकारी सुनील बेंडवाल यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती, याप्रकरणी गुन्हा दाखल करून, पोलिसांनी झाडे तोडणाऱ्या तीन मजुरांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, डिजिट फलक व्यवसायीक कैलास पसरटे याने आपल्याला मजुरी देऊन ही झाडे तोडण्यासाठी सांगितले होते, अशी माहिती या मजुरांनी दिली. मजुरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कैलास पसरटे याचा या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पसरटे याने तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

...तर कैलास पसरटेला काळ्या यादीत टाकणार

तर दुसरीकडे नगर परिषदेकडून शहरातील डिजिटल बोर्ड लावण्याचे कंत्राट कुणालाही देण्यात आले नसून, कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र कोणीही अधिकृत टेंडर भरलेले नाही, त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी शहरातील यापूर्वी कंत्राट देण्यात आलेल्या बोर्ड मालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. नियमबाह्य बोर्ड लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नियमबाह्य झाडे तोडल्या प्रकरणी कैलास पसरटे यांच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास, त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात येईल अशी माहिती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details