बुलडाणा- सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल करण्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये आलमपुर ता नांदुरा, जळका भडंग आणि गोपाळ नगर येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी आज (शुक्रवारी) सायंकाळी 3 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
बुलडाण्यात दिवसभरात 3 रुग्णांची कोरोनावर मात, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 32 वर
जिल्ह्यात कोरोनावर मात देत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 32 झाली आहे. मागील 10 दिवसांपासून कुठलेही लक्षण नसल्यामुळे शासनाच्या नवीन निकषानुसार या रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.
रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये आलमपूर (ता.नांदुरा) येथील 20 वर्षीय युवक, जळका भडंग येथील 25 वर्षीय युवक आणि गोपाळ नगर (खामगाव) येथील 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. कोरोनावर मात देत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात 32 झाली आहे. मागील 10 दिवसांपासून कुठलेही लक्षण नसल्यामुळे शासनाच्या नवीन निकषानुसार या रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते त्यांना डिस्चार्ज पेपर देण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. टापरे उपस्थित होते.
रुग्णालयातून बाहेर पडताच कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. कोरोनावर मात केल्यामुळे आनंदित भावमुद्रेत रुग्ण घरी परतले. शासनाने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना घरपोच सोडले.