बुलडाणा - जिल्ह्यातल्या नागापूर परिसरात मेहकर-मालेगाव रोडवर दोन कंटेनर व दुचाकीचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
बुलडाण्यात दुचाकी व दोन कंटेनरचा विचित्र अपघात, तीन जण जागीच ठार - अपघात वृत्त
नागापूर परिसरात मेहकर - मालेगाव रोडवर दोन कंटेनर व दुचाकीचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीवरून तिघे जण पातूरहून सायखेडाकडे जात होते. दरम्यान दुचाकी नागापूर गावाजवळ आली असताना कंटेनरने दुचाकीला धडक दिली. दोन कंटेनर आणि दुचाकीच्या या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक वय 70 वर्ष, जमीला खातून अब्दुल जब्बार वय 58 वर्ष व अब्दुल जब्बार वय 10 वर्ष अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की अपघातात दुचाकीचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान अपघातामुळे या परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.