बुलडाणा - जिल्ह्याची कोरोनामुक्त रुग्णाकडे वाटचाल प्रगतीपथावर असून आज शनिवारी 25 एप्रिलरोजी कोरोना रुग्णालयातून तीन बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.
आनंदाची बातमी : 3 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी; बुलडाण्यात उरले सहा बाधित - बुलडाण्यात उरले सहा कोरोना बाधीत रुग्ण...
बुलडाणा जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. आज शनिवारी 25 एप्रिल रोजी कोरोना रुग्णालयातून तीन कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना देण्यात आली. यावेळी त्याचाही टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.
![आनंदाची बातमी : 3 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी; बुलडाण्यात उरले सहा बाधित patients get discharged in Buldana district](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6936533-254-6936533-1587814220159.jpg)
सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर, देऊळगांवराजा आणि चिखली येथील रुग्णांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुमनचंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. मोहम्मद अस्लम, डॉ. सचिन वासेकर, डॉ. सैय्यद अरशद, यांच्यासह रुग्णालयातील नर्सेससह रुग्णालयातील सर्वच स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.
बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. काही दिवसापूर्वी 17 एप्रिलला 3 आणि 20 एप्रिलला 5 असे एकूण 8 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे होवून घरी परतले आहेत. तर गुरुवारी अजून 3 कोरोनाबाधितांना रूग्णांना सुट्टी देण्यात आली होती. उर्वरित उपचार घेत असलेल्या 9 रुग्णांपैकी आज शनिवारी पुन्हा 3 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने त्यांना 14 दिवसाच्या होम क्वारंटाईन अटीवर सुट्टी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ 6 कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पंडीत यांनी दिली आहे.
TAGGED:
corona in Buldana district