बुलडाणा- भारतात बंदी असलेल्या विदेशी सिगारेटची अवैधरित्या विक्री करणाऱ्या बुलडाण्यातील तीन व्यापाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बुधवारी (16 डिसेंबर) ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून 1लाख 64 हजार रुपये किंमतीचे विदेशी कंपनीचे सिगारेट जप्त करण्यात आली आहे.
इंडोनेशिया देशातील सिगारेट जप्त
बुलडाणा शहरातील बस स्थानकाजवळील रॉयल ट्रेडर्स, जुनी सिनेमा टॉकीजजवळ असलेल्या महावीर किराणा आणि विशाल पान सेंटर या ठिकाणी अवैधरित्या विदेशी सिगारेटची विक्री होत असल्याची तक्रार मुंबईतून बुलडाणा पोलिसांकडे करण्यात आली होती. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी संबंधित दुकानावर छापा टाकत झाडाझडती घेतली. त्यावेळी त्यांच्या दुकानातून बंदी असलेले दोन विदेशी (इंडोनेशिया) कंपनीच्या सिगारेटचा 1 लाख 64 हजार रूपये किंमतीचा साठा आढळून आला. तो साठा जप्त करुन रॉयल ट्रेडर्सचे मोहम्मद इमरान मोहम्मद इक्बाल, विशाल पान सेंटरचे विजय सूर्यवंशी आणि महावीर किरणाचे संजय हुकुमचंद ओस्तवाल या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा -कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी आंदोलन
हेही वाचा -द्रासमध्ये झालेल्या बर्फवृष्टीत बुलडाण्यातील जवानाला वीरमरण, २० डिसेंबरला होणार अंत्यसंस्कार