महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा : विनापरवानगी वृक्ष तोडणाऱ्या तिघांना अटक

बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकातील विनापरवानगी मोठी तीन वृक्ष 22 मार्चला कापण्यात आली होती. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून न्यायलयाने तिघांनाही 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी व पोलीस
आरोपी व पोलीस

By

Published : Mar 29, 2021, 5:37 PM IST

बुलडाणा - 22 मार्चला सकाळच्या सुमारास बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकातील विनापरवानगी मोठी तीन वृक्ष तोडणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विजय गवई, रफिक हनिफ चौधरी व अफरोज खान अहमद खान (तिघे रा. जोहर नगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना रविवारी (दि. 28 जानेवारी) न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्यांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढवण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

22 मार्चला घडली होती घटना

सोमवारी (दि. 22 मार्च) भल्या पहाटे पर्यावरण प्रेमी अनिरुद्ध मकोने हे मॉर्निंग वॉकहून येत असताना त्यांना जयस्तंभ चौकातील आंबा, बाभूळ व वडाचे वृक्षाची कत्तल करताना काही जण आढळले. यावेळी त्यांनी कत्तल करणाऱ्यांना वृक्ष तोडीची परवानगी बाबत विचारले असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. यानंतर अनिरुद्ध यांनी कत्तल करणारी मशीन आपल्या ताब्यात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत मोबाईलद्वारे माहिती दिली. वृक्षाची कटाई करताना सोशल मीडियावर लाईव्ह केले. त्यावेळी वृक्षाची कटाई करणारे व्यक्ती घटना स्थळांवरून पसार झाले होते. या घटनाक्रमाची माहिती पर्यावरण प्रेमींना कळताच तातळीने घटनास्थळी पर्यावरण प्रेमी जमा झाले. त्यांनी नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन तथा वनविभाग यांना कळविले व रोष व्यक्त केला. त्यानंतर तिन्ही विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

वृक्ष संवर्धन अधिकाऱ्याने दिली होती तक्रार

जयस्तंभ चौकात वृक्षांची कत्तल करण्यात आलेल्या संदर्भाची माहिती नगर परिषदेचे वृक्ष संवर्धन अधिकारी तथा आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देत याबाबत लेखी तक्रार बुलडाणा शहर पोलिसांत दिली. यावरून बुलडाणा शहर ठाण्यात वृक्षाची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

डिजिटल फलकामुळे वृक्ष कापण्यात आल्याची चर्चा

जयस्तंभ चौकात ज्या ठिकाणी हे तीन वृक्ष होते त्याठिकाणी मोठे डिजिटल फलक लावण्यासाठी सांगाडा लावण्यात आलेल्या आहे. बुलडाणा नगर परिषदेद्वारे वार्षिक करार पद्धतीने जाहिरातीसाठी हे डिजिटल फलकाद्वारे वार्षिक कर दिले जाते. या जाहिरीतच्या फलकावर वृक्षाच्या फांद्या येत असल्याने फलक झाकले जात होते. यामुळे अनेक वेळा फांद्या कापण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, यावेळी हे वृक्ष थेट कापण्यात आल्याची चर्चा सध्या बुलडाण्यात रंगत आहे. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे रोजंदारी कामगार आहे. त्यांनी मजुरीने हे वृक्ष कापले आहे. हे वृक्ष कापताना मजुरांची दिशाभूल करण्यात आली असून त्यांना वृक्ष कापण्याची परवानगी असल्याचे सांगून विनापरवानगी वृक्ष कापण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.

हेही वाचा -बुलडाण्यात फुलला.. होळीचा व नवनिर्मितीचा संकेत देणारा पळस

ABOUT THE AUTHOR

...view details