बुलडाणा- विदर्भ पंढरी, अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज शुक्रवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत आहेत. पहाटेपासूनच शहर व मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ पंढरी शेगावात हजारो भाविक दाखल
विदर्भ पंढरी, अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आज शुक्रवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत आहेत. पहाटे पासूनच शहर व मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेले आहे.
दरवर्षी विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकरी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवतात. गजानन महाराजांच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा सोहळा शुक्रवारी लाखोंच्यावर भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. संत गजानन महाराजांनी पंढपुरात भक्त बापूना काळे यांना पाटील यांच्या वाड्यात विठ्ठल रूपात दर्शन दिले. तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होतात.
आज आषाढी पौर्णिमा असल्याने पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. आषाढी एकादशी निमित्ताने आज मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. यामध्ये सकाळी विशेष पूजा होणार असून दुपारी श्रींची पालखी, अश्व, गज, रथ, मेनासह नगर परिक्रमेसाठी निघणार आहे. संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पालखी परत पोहोचल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर टाळकर्यांचा 'रिंगण सोहळा' पार पडणार आहे.