महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत बंद: शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर; व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वाद - शेगावमध्ये तणाव

बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी भारत बंद आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून शेगावमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. रॅली दरम्यान दुकाने बंद करण्यावरून व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. यामुळे रॅलीत काही काळ गोंधळ उडून तणावाचे वातावरण तयार झाले होते.

शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर
शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर

By

Published : Jan 29, 2020, 1:43 PM IST

बुलडाणा - नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी भारत बंद आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून शेगावमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोनादरम्यान आंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर


बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सुमारे दोन हजांरांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. हातात विविध झेंडे घेऊन उतरलेल्या हजारो आंदोलकांनी सीएए आणि एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा - नागपुरात नितीन विरुद्ध नितीन, रंगला शाब्दिक सामना

रॅली दरम्यान दुकाने बंद करण्यावरून व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. यामुळे रॅलीत काही काळ गोंधळ उडून तणावाचे वातावरण तयार झाले होते. मात्र. पोलिसांच्या मध्यस्थीने हा तणाव दूर करण्यात आला. बहुजन क्रांती मोर्चाची रॅली चौकातून पुढे सरकताच व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यासाठी एक रॅली काढली. शेगाव शहरात शांतता असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष ताले यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details