भाजपामध्ये काम करणाऱ्यांना डावलले जात आहे - मंत्री उदय सामंत - pankaja munde
राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिले आहे. ते मी पुन्हा सांगू इच्छितो, त्यांना महाराष्ट्र सांभाळण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातील लोकांना मंत्री करावं लागले. तसेच आमच्याकडच्या एका व्यक्तीला घेऊन त्यांना मंत्री करावे लागले.पण पंकजा ताई यांना डावलले आहे. त्यांच्यामुळे भाजपमध्ये प्रचंड उद्रेक आहे.
![भाजपामध्ये काम करणाऱ्यांना डावलले जात आहे - मंत्री उदय सामंत उदय सामंत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12422276-522-12422276-1625980861431.jpg)
उदय सामंत
बुलडाणा - केंद्रीय राज्यमंत्रीच्या यादीत पंकजा मुंडे यांच्या बहिणी प्रीतम मुंडेंना डावलण्यामूळे पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे प्रकरण ताजे असतानाच भाजपात काम करणाऱ्यांना डावलले जात आहे. आणि समोरून येणाऱ्या लोकांना घेतले जात आहे, असा खोचक टोला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपालालगावला. शनिवारी रोजी बुलडाण्याच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाल्याचेही त्यांनी सांगितले.
uday samant
Last Updated : Jul 11, 2021, 12:41 PM IST