महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्ला; काजू, बदाम, मसाले लंपास

सध्या लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांच्या मागणीनुसार दुकानमालक शेख अकबर यांनी आज (बुधवार) दुपारी 12च्या दरम्यान दुकान उघडले असता कोणीतरी पाठीमागच्या भिंतीला तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले.

बुलडाणा
बुलडाणा

By

Published : Apr 1, 2020, 5:57 PM IST

बुलडाणा - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील इंडियन स्पाइसेस नामक दुकानात चोरांनी डल्ला मारून दुकानातून इलेक्ट्रॉनिक वजन काटा, पॅकिंग मशीन, काजू, बदाम, मसाल्यांसह बिर्याणीच्या तांदळाचे कट्टे, असा एकूण अंदाजे 75 हजारांचा माल चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील नगर परिषदेने तात्पुरते बांधलेल्या गाळ्यांमधील गाळा क्र. 28 मध्ये इंडियन स्पाइसेस नामक जीवनावश्यक वस्तू विक्रीचे दुकान आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांच्या मागणीनुसार दुकानमालक शेख अकबर यांनी आज (बुधवार) दुपारी 12च्या दरम्यान दुकान उघडले असता कोणीतरी पाठीमागच्या भिंतीला तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले.

दुकानातून इलेक्ट्रॉनिक वजन काटा, पॅकिंग मशीन, काजू, बदाम, मसाल्यांसह बिर्याणीच्या तांदळाचे कट्टे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

ABOUT THE AUTHOR

...view details