बुलडाणा- जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भालगाव येथील 11 वर्षीय मुलीचा घरात खेळताना गळ्याला फास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील उंच लाकडाला दोरी बांधून खेळत चिमुरडीचा मृत्यू झाला. शीला गजानन आमले, असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
चिखलीत खेळताना दोरीचा फास लागल्याने चिमुकलीचा मृत्यू - बुलडाणा गुन्हे बातमी
घरातील उंच लाकडाला दोरी बांधून खेळत चिमुरडीचा मृत्यू झाला. शीला गजानन आमले, असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
हेही वाचा - बुलडाणा; नकली सोने तारण ठेवून जिजामाता सहकारी बॅंकेला 28 लाखांचा चुना
जालना जिल्ह्यातील वानखेड या गावचा मूळ रहिवासी असलेला गजानन आमले हे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आपल्या सासऱ्याच्या घरी भालगाव येथे राहात होते. घटनेच्या दिवशी पती आणि पत्नी दोघेही कामावर शेतात गेले होते. त्यावेळी घरी धाकटा भाऊ हर्षलसह शीला छताला जोडलेल्या दोरीने खेळत होती. मात्र, अचानक दोरीने शीलाच्या गळ्याला फास लागल्याने तिचा मृत्यू झाला. शीला गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 4 थी मध्ये शिकत होती.