महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंचन विभागातील भ्रष्टाचाराच्या फाईल बंद.. म्हणजे पाणी कुठेतरी मुरतंय - विजय पांढरे - सिंचन विभागातील भ्रष्टाचाराच्या फाईल बंद

या निर्णयाचा धागा सत्ता स्थापनेशी जोडला जात आहे. सिंचन घोटाळ्याला उघडकीस आणणारे सिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सत्तास्थापनेच्या नाट्यामध्ये या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत आहे, अशी शंका त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.

विजय पांढरे

By

Published : Nov 25, 2019, 8:43 PM IST

बुलडाणा -सिंचन विभागातील भ्रष्टाचाराच्या फाईल बंद करणे म्हणजे, कुठेतरी पाणी मुरत आहे, अशी प्रतिक्रिया सिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी दिली आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाअंतर्गत सुरू असलेल्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या नऊ फाईल्स बंद करण्याचे आदेश आज देण्यात आले आहेत.

विजय पांढरे

या निर्णयाचा धागा सत्ता स्थापनेशी जोडला जात आहे. सिंचन घोटाळ्याला उघडकीस आणणारे सिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सत्तास्थापनेच्या नाट्यामध्ये या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत आहे, अशी शंका त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.

हेही वाचा -'अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याचे आरोप सिद्ध झालेले नाहीत'

दरम्यान, अजित पवारांचा संबंधीतच्या या फाईल असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बंद करण्यात आलेल्या फाईल्समध्ये अजित पवार यांचे नाव नसल्याचे स्पष्टीकरण एसीबीने दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details